Friday, July 12, 2019

आज दि.18/06/2019 रोजी  **विद्यार्थी मित्र फाउंडेशन,ठाणे** या  संस्थेच्या वतीने आमच्या जि.प.पू.प्रा.केंद्रीय शाळा झोंबडी नं.१ या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्कुल बॕग,200 पाणी फुल साईज क्वायरबुक वह्या , प्रती विद्यार्थी 6 नग, पाटी,पेन्सिल,चित्रकला वही,कंपास पेटी अन्य शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संस्थेचे मा.श्री ऋतेश मनियार सर,मा.श्री कबीर सर, मा.श्री नारायणम् सर या सर्वांनी विद्यार्थीच्या जागी जावून शैक्षणिक साहित्य वाटप केले.त्यापूर्वी त्यांनी विद्यार्थी बरोबर मनमोकळेपणाने गप्पा मारून त्यांच्याशी हितगुज केले.विद्यार्थीच्या कला गुणांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले.सर्व पदाधिकारी आय.टी.क्षेत्रात  काम करत असून ग्रामीण भागातील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्याचा त्याचा प्रयत्न हा नक्की स्तुत्यपर असून कौतुकास्पद आहे.माणसात देव शोधणारी देव माणस आज पाहिली. संस्थेच्या सर्व पदाधिकारी व श्री सतिश मुणगेकर सर यांनी विशेष प्रयत्न करून हा शैक्षणिक उठाव घडवून आणला त्यांचे सुध्दा शाळेच्या वतीने व  झोंबडीवासियांच्या वतीने धन्यवाद.🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment